माढा लोकसभा मतदारसंघातले (Madha Lok Sabha) नाराज धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले असून त्यांचा आजच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्याचवेळी धैर्यशील मोहिते पाटलांची माढ्यातून उमेदवारीही जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप निरंजन सिंह निंबाळकर पाटील यांना उमेदवारी दिल्याने धैर्यशीय मोहिते पाटील नाराज होते. ही संधी साधून शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील भाजपच्या वतीने करण्यात आला होता. मात्र हा भाजपचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. मोहिते पाटील आणि समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज होते. आज धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाच्या वतीने त्यांना माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देखील देण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.