नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या होत्या.
नवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांविरुद्ध नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत नेरुळ विभागात कारवाई केली. नेरूळ पूर्व येथील भगवान बाबा गार्डन, सेक्टर ९, नेरुळ ग्रीनलॅन्ड अपार्टमेंटजवळ नवी मुंबई महापालिका जल उदंचन केंद्रासमोर भर रस्त्यात पदपथावर अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या होत्या. त्या झोपडपट्टयांमधून अवैध व्यवसाय सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी रात्री २० ते २५ लोक पदपथावरच झोपत असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना वाट काढणे कठीण झाले होते.